याबाबत माहिती अशी की, मुकूंदा दामू पाटील रा. ममुराबाद ता.जि.जळगाव हे पत्नी व तीन मुलांसह वास्तव्याला आहे. मुकूंदा पाटील यांचा मोठा भाऊ डिगंबर दामू पाटील यांच्या मुलीचे लग्न असल्याने घरात लग्नाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. रविवारी १७ एप्रिल रोजी मुकूंदा पाटील आणि त्यांची पत्नी दिपाली पाटील हे दोघेजण भावाच्या घरी गेले होते. [ads id="ads2"]
त्यावेळी त्यांचा मुलगा प्रणव हा घरी एकटाच होता. सकाळी ८ वाजेच्या सुमारास बाथरूममध्ये बादलीत हिटर लावले होते. त्यानंतर बाजूलाच प्रणव आंघोळ करण्यासाठी बसला. अचानक त्याला विद्यूत हिटरचा धक्का लागल्याने प्रणवचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, लग्नात आलेले रविंद्र पाटील हे घरी आले असता हा प्रकार लक्षात आला.
हेही वाचा :- यावल तालुक्यातील सांगवी खुर्द येथे किरकोळ कारणावरून दोन गटात दंगल ; १८ जणांविरूध्द गुन्हा दाखल
हेही वाचा :- बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानसाधनेच्या जोरावर, रक्ताचा थेंब ही न सांडता महान क्रांती घडवून आणली- लक्ष्मणराव पाटील
त्यांनी तातडीने नातेवाईकांना बोलावून घेतले. मुलाचा मृत्यू झाल्याचे पाहून आईवडीलांनी हंबरडा फोडला. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



