गेल्या दोन महिन्यांपासून रावेर तालुक्यातील स्वछ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक लाभाचे प्रकरण गाजते आहे. लाभार्थ्यांने शौचालय बांधल्यानंतर त्याला पंचायत समिती मार्फत त्याच्या बँक खात्यावर रक्कम रुपये १२०००/- चे अनुदान देण्यात येते ; मात्र हे अनुदान वितरित करतांना प स रावेर येथील सहायक लेखाधिकारी, विस्तार अधिकारी( ग्रा प),गट विकास अधिकारी सन २०१५ ते २०२२ या आर्थिक वर्षात गट समन्वयकाशी संगनमत करून आपल्या पत्नीच्या, मुलांच्या, नातेवाईंकांच्या नावाचा बँकेला पाठविलेल्या यादीत समावेश करून अनुदान लाटत असल्याच्या बातम्या माध्यमांकडून प्रसिद्ध झाल्याने या योजनेतला गैरप्रकार उघडकिस आल्याने पंचायत समितीचे धाबे दणाणले आहे. [ads id="ads2"]
दोषींवर कारवाईची मागणी देखील दोन महिन्यांपासून सुरू आहे. याच दरम्यान प्रकरण दडपण्यासाठी स्वछ भारत मिशन कक्षातील कंत्राटी कर्मचारी यांचा बळी देऊन त्यांचेवर गुन्हा दाखल करण्याच्याही वेगवान हालचाली सुरु असल्याची चर्चा प स रावेर कार्यालयात सुरू आहे.मात्र आता सदर प्रकरणी आ. चंद्रकांत पाटील यांनी स्वतः लक्ष घातल्याने निःपक्षपातीपणे चौकशी होऊन दोषींवर कारवाई होईल, अश्या प्रतिक्रिया लोक व्यक्त करीत आहेत.
हेही वाचा :- ममुराबाद येथील १३ वर्षीय मुलाचा वीजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू
हेही वाचा :- यावल तालुक्यातील सांगवी खुर्द येथे किरकोळ कारणावरून दोन गटात दंगल ; १८ जणांविरूध्द गुन्हा दाखल
हेही वाचा :- बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानसाधनेच्या जोरावर, रक्ताचा थेंब ही न सांडता महान क्रांती घडवून आणली- लक्ष्मणराव पाटील




