🔹 प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व ग्रंथ देऊन सन्मानित
धरणगांव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर
धरणगांव - धरणगाव चे सुपुत्र तथा जिल्हा परिषद शाळा पिंपळे बु॥ चे आदर्श शिक्षक कैलास निंबा पवार यांना जळगाव येथील कवि संमेलनात प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले.[ads id="ads1"]
तात्यासाहेब ज्योतिराव फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यांच्या जयंती निमित्ताने समतावादी साहित्य शिक्षक मंडळ जळगाव तर्फे सीताबाई गणपत भंगाळे विद्यालय खोटे नगर जळगाव येथे कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक आणि व्याख्याते प्राध्यापक भरत शिरसाठ होते. कविसंमेलनाचे उद्घाटन प्राध्यापक डॉ.अतुल सुर्यवंशी यांनी केले. [ads id="ads2"]
कविताचे उत्कृष्ट सादरीकरण केल्यामुळे धरणगाव येथील शिक्षक कैलास निंबा पवार यांचा स्मृतीचिन्ह ,प्रमाणपत्र व ग्रंथ देऊन गौरव करण्यात आला या आधी त्यांना २६ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच प्रा. विमल वाणी, प्रा.कमलेश गायकवाड, एस ए पाटील, रणजित सोनवणे, सागर कोळी, प्रकाश पाटील, गणेश निकम, सुरेखा पाटील, सौ. रंजना कोळी, भिमराव सोनवणे, यशवंत कापडे , अजय भामरे, गिरीश जाधव, दिनेश मोरे, शंकर भामरे, जीवन कुमार शिरसाट, वर्षा अहिरराव, विजय सूर्यवंशी, आर जे सुरवाडे, ईश्वर वाघ, विनोद जाधव, रमेश बनकर, सुमेध साळवे, इत्यादी कवींनी उत्कृष्ट कविता सादर केल्याने त्यांचा देखील गौरव करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर व सिनेट सदस्य विष्णू भंगाळे शिक्षण विस्ताराधिकारी रविकिरण बिर्हाडे, समता शिक्षक परिषदेचे माजी जिल्हा अध्यक्ष भिमराव सपकाळे, उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव एस ए पाटील यांनी केले.
सूत्रसंचालन प्रमोद आठवले, सौ रंजना इंगळे, अश्विनी कोळी वर्षा अहिरराव यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समतावादी साहित्य शिक्षक मंडळ चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.



