ऐनपुर प्रतिनिधी (विजय एस अवसरमल)
ऐनपुर येथील विकास अवसरमल यांना सामाजिक शैक्षणिक व सामाजिक न्याय विभाग भारत सरकार यांच्या वतीने डॉ आंबेडकर रत्न अवार्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्री विकास अवसरमल (मिलिंद) याना सामाजिक, शैक्षणिक व सामाजिक न्याय विभाग भारत सरकार यांचे वतीने सविधान गौरव रथ यात्रा संपुर्ण जळगांव जिल्ह्यांत फिरवून समाज्याच्या तळागळातील वंचित उपेक्षित घट का पर्यंत सविधान प्रति जनजागृती केल्याने यांच्या कार्याची दखल भारतीय बौद्ध संघ नवी दिल्ली व भारत सरकार सामजिक न्याय विभाग यानी घेतल्याने त्याना नुकताच डॉ.आंबेडकर रत्न अवार्ड पुरस्कार नवी दिल्ली तालकतोरा स्टेडीयम येथे भारत सरकार चे केंद्रिय मंत्री श्री अर्जुन जि मेघवाल यांच्या हस्ते समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आला या समारंभाच्या अध्यक्ष स्थानी भन्ते संघ प्रिय राहुल राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय बौद्ध संघ नवी दिल्ली हे होते.[ads id="ads2"]
यावेळी माजी केंद्रीय केबिनेट मंत्री सत्यनारायण जि जटीया राज्यपाल थावर चंद्र्जी देहलोत खा.सुमित्रा सोनी खा.अमिना जि सोनकर भारत सरकार चे वरिष्ट खा.दिल्ली प्रदेश अध्यक्ष गुप्ता जि व इतर मान्यवर उपस्थित होते विकास अवसरमल याना हा पुरस्कार मिळाल्या बद्दल माजी मंत्री गिरिश जी महाजन आ.राजू मामा भोळे खा.उन्मेश दादा पाटिल खा.रक्षा ताई खडसे आ.संजय जी सावकारे आ.मंगेश दादा चौहान,सुरेश भाऊ धनके,श्रीकांत महाजन, नंदू महाजन, प्रल्हाद पाटील, पद्माकर महाजन, राजन लासुरकर, व इतर सर्व पदाधिकारी सामजिक मान्य मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


