विवरे बु प्रतिनिधी (समाधान गाढे) रावेर तालुक्यातील विवरे बु येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत शेतकरी पॅनलने धनजी लढे यांच्या नेतृत्वाखाली लोकमान्य पॅनलचा धुव्वा उडवत वर्चस्व राखले आहे.[ads id="ads1"]
शेतकरी पॅनलचे विजयी उमेदवार असे समाधान गाढे, संतोष धनगर, : धनजी लढे, सुधा राणे, पुष्पा तळेले, श्रीकृष्ण भिरुड, किरण पाचपांडे, मधुकर पाटील, यादवराव पाटील,गोपाळ राणे, केतन राणे, प्रल्हाद राणे, विलास सपकाळ हे उमेदवार निवडून आले आहेत. [ads id="ads2"]
निवडणूक निर्णय अधिकारी आय. बी. तडवी व सहकारी यांनी काम पहिले. सोसायटी परिसरात निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित सदस्यांचे ग्रा.पंसदस्य विपिन राणे, शिवाजी पाटील, गोपाळ पाटील, हनिफ पिंजारी, समद मिस्त्री, किशोर पाटील, पिंटू माळी, अॅड. दीपक गाढे, विनोद मोरे यांनी अभिनंदन यांनी केले आहे.



