जळगांव ( प्रतिनिधी ) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार सर्व स्तरावर पोहचविण्यासाठी आंबेडकरी अनुयायांनी जयंतीचे औचित्य साधून आता आत्मशोध घ्यावा, असे आवाहन प्रसिद्ध साहित्यिक दीपध्वज कोसोदे यांनी केले. ते जळगांव येथील अनुराग स्टेट बँक सोसायटीतील तथागत मित्र मंडळ आयोजित आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात बोलत होते.[ads id="ads1"]
दरवर्षी तथागत मित्र मंडळाच्या वतीने उत्स्फूर्तपणे आंबेडकर जयंती साजरी करण्यात येते. दि १७/०४/२२ रोजी जयंतीचे औचित्य साधून मंडळाच्या वतीने प्रसिद्ध साहित्यक दीपध्वज कोसोदे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या या अभ्यास पूर्ण भाषणात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकूणच कार्यावर प्रकाश टाकला. [ads id="ads2"]
तत्पूर्वी योगेश भालेराव यांनी गायिलेल्या भीम गीतांचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप इंगळे होते.डॉ सुरवाडकर, प्रा प्रबोध सपकाळे, मिलिंद बिऱ्हाडे , सेवा निवृत्त बाल विकास प्रकल्प अधिकारी बोदडे, यांची विशेष उपस्थिती होती. या वेळी मंडळात नव्याने सदस्य झालेल्या सभासदांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास कॉलनीतील मोठया संख्येने लोक उपस्थित होते.



