रसलपूर येथे दोन कुटुंबात तूफान हाणामारी रावेर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी दंगलीचे गुन्हे दाखल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे
रसलपूर येथे दोन कुटुंबात तूफान हाणामारी रावेर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी दंगलीचे गुन्हे दाखल


रावेर प्रतिनिधी राजेंद्र अटकाळे

रावेर तालुक्यातील रसलपूर येथे आज दि. १७ एप्रिल रविवार रोजी किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबात तूफान हाणामारी झाली. यात दोन्ही फिर्यादी जखमी झाल्याची घटना घडली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी रावेर पोलीसात परस्परविरोधी दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.[ads id="ads1"] 

         या बाबत सविस्तर वृत्त असे की,  रसलपूर येथील नबाब शेख (वय ४२) यांचा मुलगा बक-या बांधत असतांना नबाब शेख मुलाला शिव्या देत होता. या वरुन हसनुर बी शेख कुरेशी (वय ५५) यांचा ‘नबाब शेख आपल्याला शिव्या देत आहे. असा समज झाला.[ads id="ads2"] 

     याचा राग आल्याने दोन्ही कुटुंबात तूफान हाणामारी झाली. या प्रकरणी रावेर पोलीस स्टेशनला नबाब शेख यांच्या फिर्यादीवरुन हसनुर शेख, अल्ताफ शेख, ईस्ताक शेख, हंसार शेख अकबर शेख, शबनम शेख यांच्या विरुद्ध दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

      तर हसनुर बी शेख कुरेशी यांच्या फिर्यादीवरुन नबाब शेख, मुस्कान शेख, सायराबी शेख, शफीक शेख, अनिस शेख यांच्याविरुद्ध दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

        सदर दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सतीष सानप करीत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!