रावेर जवळ दुचाकी-ट्रकच्या धडकेत एक गंभीर जखमी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 रावेर जवळ दुचाकी ट्रकमध्ये धडकेत एक गंभीर जखमी


रावेर शहरातील ब-हानपुर रोड स्थित असलेल्या व्ही. एस. नाईक कॉलेजजवळ (V S Naik College ) मोटरसायकल व ट्रकची समोरा-समोर धडक झाल्याने मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे.[ads id="ads1"] 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रावेर (Raver) शहरातील व्ही. एस. नाईक कॉलेजजवळ मध्य प्रदेश कडून ट्रक नंबर MP 06 HC 1605 रावेर मार्गे जळगावच्या दिशेने बटाटे घेऊन जात होता. [ads id="ads2"] 

  तर रावेर कडून MH 19 DR 8335 या मोटरसायकलने गोविंदा देविदास महाजन अटवाडेच्या (Atwade) दिशेने जात होता. या दरम्यान मोटरसायकल व ट्रकची समोरा-समोर धकड झाली. यात गोविंदा महाजन याच्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली असून ट्रक रावेर पोलिस स्टेशनला (Raver Police Station)  जमा झाला आहे. जखमी मोटरसायकलस्वारावर उपाचार सुरू आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!