जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) भारतीय बौद्ध महासभा जळगाव तालुका व शहर यांच्या वतीने वाघ नगर बुद्धविहार येथे प्रा. डॉ. संजीव साळवे व सुभाष सपकाळे यांचा आज सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. संजीव साळवे यांना नुकतीच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे रसायनशास्त्र या विषयांमध्ये पीएचडी प्रदान करण्यात आलेली आहे. [ads id="ads1"]
यानिमित्ताने त्यांचे स्वागत आणि सत्कार भारतीय बौद्ध महासभा तर्फे करण्यात आला. तर सुभाष सपकाळे सोबतच त्यांच्या सुविद्य पत्नी कल्पनाताई सुभाष सपकाळे यांचाही स्वागत आणि सत्कार करण्यात आला. नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी मध्ये म्हणजे महू या गावी सुभाष सपकाळे यांनी श्रामनेर दीक्षा घेऊन दहा दिवसीय शिबिर यशस्वीरीत्या पूर्ण केले. [ads id="ads2"]
त्यानिमित्ताने त्यांचा सहपत्नी स्वागत आणि सत्कार भारतीय बौद्ध महासभा तर्फे वाघ नगर बुद्ध विहार जळगाव येथे करण्यात आला. या सत्कार सोहळ्यास जळगाव जिल्हा पूर्वचे कोषाध्यक्ष बी. एस. पवार, जळगाव शहर शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिल शिरसाळे, तालुका अध्यक्ष जगदीश सपकाळे, तालुका संघटक सुपडू तथा यशवंत जाधव, तालुका संघटक संतोष गायकवाड, विजय गायकवाड, बुद्धविहार व्यवस्थापक विलास तायडे, केंद्रीय शिक्षिका माधुरीताई भालेराव, नंदाताई बोदोडे, उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कोषाध्यक्ष बी. एस. पवार होते. प्रा. डॉ. संजीव साळवे व सुभाष सपकाळे दोघ सत्कारमूर्ती यांनी आपापले मनोगते व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष बी. एस. पवार यांनी अध्यक्षीय भाषणात दोघांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यालयीन सचिव आनंद ढिवरे यांनी केले.



