सर्पदंश झाल्याने 4 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू ;जळगाव जिल्ह्यातली घटना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 सर्पदंश झाल्याने 4 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना जामनेर तालुक्यातील तळेगाव (Talegaon Taluka Jamner)  येथे घडली याबाबत सविस्तर माहिती अशी की, खंडू माणिक पाडोळसे (कोळी) हे तळेगाव येथे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. त्यांच्या लहान मुलाला निमोनिया झाल्यामुळे त्यांनी अथर्व हाँस्पीटल ला मुलाला ऍडमिट केले होते. [ads id="ads2"] 

  तसेच चार वर्षाची रोहिणीला बहिणीकडे ठेवले होते. २६ रोजी रात्री १२ः३० वाजता चिमुकली कुमारी रोहीणी खंडू पाडोळसे (कोळी)वय ४वर्ष ही झोपेत असताना तिला विषारी साप चावल्याने तिला प्रथम उपचार म्हणून डॉ. एम.बी. चौधरी यांच्याकडे नेले असता त्यांनी सिव्हिल हॉस्पिटल जामनेर (Civil Hospital Jamner) येथे नेण्याचे सांगितले मात्र तळेगाव – जामनेर दरम्यान रस्त्याने जात असताना चिमुकली रोहिने यांनी अर्ध्या रस्त्यातच आपले प्राण सोडले सिव्हिल हॉस्पिटल जामनेर येथे दाखवले असता असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे पाडळसे परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!