यावल पालिकेच्या प्रभाग‎ रचनेवर विभागीय आयुक्तांकडे अपील‎

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल दि.27(सुरेश पाटील) येथील नगरपरिषदेच्या प्रारूप प्रभाग‎ रचनेवर ६ हरकती प्राप्त झाल्या होत्या.‎ त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात‎ सुनावणी घेण्यात आली. प्रभाग क्रमांक ‎सहामधील हरकतीवर योग्य निर्णय न‎ झाल्याने तक्रारदाराने थेट विभागीय आयुक्तांकडे आता अपील दाखल केले.‎[ads id="ads1"] 

यावल नगर परिषदेची प्रारूप प्रभाग‎ रचना प्रसिध्द करण्यात आली होती.‎ त्यावर दिनांक १४ मेपर्यंत हरकती‎ मागवण्यात आल्या होत्या. यात प्रभाग‎ क्रमांक ६ मध्ये बबलू येवले, प्रभाग‎ क्रमांक ८ मध्ये पुंडलिक बारी, प्रभाग‎ क्रमांक ५ मध्ये हनीफ खान, प्रभाग‎ क्रमांक १ व २ मध्ये मनोहर सोनवणे,‎ प्रभाग क्रमांक ८ व ११ मध्ये कदीर खान‎ करीम खान आणि प्रभाग क्रमांक ४ मध्ये‎ चेतन अढळकर यांनी हरकत नोंदवली‎ होती.[ads id="ads2"] 

   या सर्व हरकतींवर २१ मे रोजी,‎ जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी‎ अभिजीत राऊत यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. सुनावणीच्या वेळी‎ नगरपरिषदेचे सक्षम अधिकारी उपस्थित‎ नव्हते. ज्या पध्दतीने प्रभाग क्रमांक ६ ची‎ नविन रचना आहे, यात निवडणुक‎ आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन‎ झालेले नाही. असे असतांना‎ जिल्हाधिकारी कार्यालयात योग्य‎ सुनावणी झाली नाही. म्हणुन प्रभाग‎ क्रमांक ६ मध्ये हरकत नोंदवणारे बबलू‎ येवले यांनी विभागीय आयुक्त राधाकृष्ण‎ गमे यांच्याकडे अपील दाखल केले आहे.‎

अशी आहे तक्रार

प्रारूप प्रभाग रचनेत निवडणूक‎ आयोगाच्या सुचनेनुसार उत्तरे कडून पुर्व,‎ उत्तर इशान्येकडे व इशान्येकडून पुर्वेकडे‎ आणि पुर्वेकडून पश्चिमेपर्यंत असेच‎ पश्चिमेपासून ते दक्षिणेपर्यंत प्रभाग रचना‎ अपेक्षित होती. मात्र, प्रभाग ६ मध्ये‎ दिशेचा उल्लेख न करता एका घरापासून‎ दुसऱ्या घरापर्यंत अशी रचना केली‎ असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. प्रारूप प्रभाग रचनेत निवडणूक‎ आयोगाच्या सुचनेनुसार उत्तरे कडून पुर्व,‎ उत्तर इशान्येकडे व इशान्येकडून पुर्वेकडे‎ आणि पुर्वेकडून पश्चिमेपर्यंत असेच‎ पश्चिमेपासून ते दक्षिणेपर्यंत प्रभाग रचना‎ अपेक्षित होती. मात्र, प्रभाग ६ मध्ये‎ दिशेचा उल्लेख न करता एका घरापासून‎ दुसऱ्या घरापर्यंत अशी रचना केली‎ असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.‎

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!