श्रामणेर शिबिरात सामाजिक सलोख्याचे दर्शन ; खिर्डी बु येथे आयोजन, २५ जणांनी घेतली दिक्षा,श्रामणेरांना दिले प्रशिक्षण

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


ऐनपुर प्रतिनिधी (विजय एस अवसरमल)

बुद्धं सरणंम गच्छामी, धम्मं सरणंम गच्छामी, संघं सरणंम गच्छामी, सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे...असा जयघोष करीत संपूर्ण विश्वात शांती , सुख , समृध्दी नांदावी सर्वांचे मंगल होवो सर्वांचे कल्याण होवो हा संदेश पोहचवण्याचे काम करणाऱ्या धम्मातून श्रामणेर शिबिराच्या माध्यमातून पोहचवला या शिबिरात सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभागी होऊन मदतीचा हात दिला खिर्डी बु येथे सामाजिक सलोख्याचे दर्शन झाले.[ads id="ads1"] 

   एकीकडे समाजा समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत असताना खिर्डी बु येथील ग्रामस्थांनी नवा आदर्श निर्माण केला या शिबिरात एकूण २५ जणांनी दिक्षा घेतली बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा जळगाव व ग्रामशाखा खिर्डी बु यांच्या विद्यमाने खिर्डी बु येथे १० दिवशीय श्रामणेर बौध्दाचार्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.[ads id="ads2"] 

   सदर श्रामणेर संघाचे उपाध्याय पुज्य भंते दिपंकर थेरो चैत्यभूमी दादर मुंबई हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे व केंद्रीय शिक्षक विजय अवसरमल हे होते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष शैलेंद्र जाधव गुरुजी हे होते तर उद्घाटक आर पी आय चे जिल्हा अध्यक्ष राजु भाऊ सुर्यवंशी हे होते तर धुप प्रज्वलन कैलास कोचुरे व राजु सवर्णे दिप प्रज्वलन अनोमदर्शी तायडे व मुकुंद भाऊ सपकाळे पुष्प पुजा सुरेखा ताई तायडे व सुमंगल अहीरे यांनी केले या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा खिर्डी बु व अबाल ऋध्द बालबालिका व नागरीकांचे सहकार्य लाभले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!