पिसाळलेल्या वानराने अचानक झडप मारल्याने चिमूकलीला गमवावा लागला जीव : रावेर तालुक्यातील आंदलवाडी येथील घटना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 रावेर प्रतिनिधी (विनोद कोळी) 

रावेर तालुक्यातील निंबोल (Nimbol Taluka Raver) येथील प्रदिप प्रकाश कोळी यांची लहान मुलगी काही कारणास्तव मामाच्या घरी रावेर तालुक्यातील आंदलवाडी (Aandalwadi Taluka Raver)  येथे गेली होती.तेथे बाहेर अंगणात काही मुली सोबत खेळत असताना अचानक पिसाळलेल्या वानर झाडा वरुन मुलींच्या समोर उडी मारताच मुली सैरावैरा पळाल्या.[ads id="ads1"] 

  त्यात पुर्वा नावाच्या 6 वर्षीय मुलीवर पिसाळलेल्या वानराने अचानक हल्ला केल्याने पूर्वा नामक मुलगी जमिनिवर कोसळून,मुलीला डोक्यावर मागील बाजुला जबर मार बसला.[ads id="ads2"] 

  लगेच उपचारा साठी मुलीला जळगाव येथील डॉ.उल्हास पाटील यांचे गोदावरी हॉस्पिटल (Godavari Hospital)   येथे दाखल केले असता.अथक डॉक्टर च्या परिश्रमानंतर उपचारा दरम्यान तचिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.4 वर्षापुर्वीचा मयत मुलीच्या वडिलाचे निधन झाले होते.

हेही वाचा :- मुलासह आई हरवल्याची रावेर पोलिसात गुन्ह्याची नोंद 

मुलीच्या पश्र्च्यात,आजी,आजोबा,आई,आणि,मोठी बाहीण आहे, 6 वर्षीय मुलीच्या निधनामुळे संपूर्ण निंबोल गावात शोककळा पसरली आहे.आही सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!