परंतु सदर महिला हि आज पावेतो तिचा भाऊ यांचे कडेस गेलेली नाही. म्हणुन दिनांक 28/042022 रोजी रावेर पोलीस ठाण्यात हरविले बाबतची नोंद निलेश रमेश बारी, वय 32, रा. उटखेडा तालुका रावेर यांचे खबर वरुन मिसीग दाखल करण्यात आली आहे.[ads id="ads2"]
हरविलेल्या व्यक्तीचे वर्णन शरीराने मध्यम, रंगाने सावळा, चेहरा गोल, - डोक्याचे केस काळे मध्यम, दोन्ही कानाचे कमी ऐकु येते, नाकावर ऑपरेशन निशाण, उची 5 फुट, अंगात लाल रंगाची साडी. सदर महिलेस मराठी भाषा बोलता येत नाही समजतपण नाही. हिंदी भाषा बोलता येते.
हेही वाचा :- वानराने अचानक झडप मारल्याने चिमूकलीला गमवावा लागला जीव : रावेर तालुक्यातील आंदलवाडी येथील घटना
सोबत लहान मुलगा निर्मल निलेश बारी वय 2 वर्षे चेहरा गोल, शरीराने साधारण, अंगात लाल टी शर्ट, जिन्स पँन्ट आहे. अशा वर्णनाची महिला व लहान मुलगा कोणाला आढळुन आल्यास त्यांनी रावेर पोलीस स्टेशन ला 02584-250333 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक कैलास नागरे, पोलीस अंमलदार जगदीश पाटील यांनी केले आहे.



