रावेर -यावल तालुक्यात ग्रामीण परिसरात अक्षय तृतीया (आख्खाजी)च्या दिवशी रात्रीस खेळ चाले! तालुक्यात खेळला जाणारा अवैध जुगार (पत्ता) यावर यंदा आळा बसणार का?..

निनावी

रावेर -  जळगाव खान्देश या परिसरात अक्षय तृतीया सणाला आख्खाजी म्हणून ओळखले जाते त्या दिवशी घागर भरणे खास टाकणे सासरवाशी मुली माहेरी येणे आंब्यांचा रस खाणे असे वैगेरे वैगेरे विविध कार्यक्रम घरोघरी केली जातात, असा हा सण आपल्याला तर या सणाविषयी माहितीच आहे, मात्र त्यात रात्रीस खेळ चाले म्हणजे काय? तर आपण आता महत्त्वाच्या मुद्यावर बोलु आख्खाजी या पवित्र दिवशी जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्या सह असे काही ठराविक तालुके , गावे ,शहरे आहेत की  [ads id="ads2"] तीथे जुगार खेळला जातो दरवर्षी खेड्यापाड्यात ब-याच ठिकाणी अवैध मोठ मोठाले जुगार अड्डे जमतात दुर दुरुन लोक येथे येतात या सोबतच मध्य प्रेमी यांची तर वेगवेगळ्या स्वरुपात वेवस्ता देखील असते मात्र या कडे ग्रामीण भागात दुर्लक्ष केले जाते, मग यावर कुठले नियम नाहीत का? दरवर्षी दुर्लक्ष केले जाते यंदा ही तसेच सुरु राहील का? आख्काजी ला अवैध जुगार रात्री, मध्यरात्री पासुन ते पहाटे पर्यंत खेळला जातो यांत आतापर्यंत बरेच घरे उधवस्त झालीत नकोत्या वेसनाला युवा पिढी बळी झाली. 


यंदा नेमके यावर काय नियंत्रण असणार ते तर दिसुनच येईल यंदा जर असेच अवैध जुगार अड्डे सुरु असतील तर अवैध जुगार अड्ड्यावरील मालकांवरच कार्यवाही होणे गरजेचे आहे ,ग्रामीण क्षेत्रात जर असेच सुरु असतील तर यांवर आळा कसा बसेल यासाठी ग्रामप्रशासनाने देखील लक्ष दिले पाहिजे अवैध जुगार अड्डे च जर बंद झाले तरच या गोष्टी वर वचक बसेल म्हणून प्राशासकीय यंत्रणेने योग्य तो निर्णय घ्यावा असे असंख्य कुटुंबांकडुन बोलले जात आहे या अवैध जुगार अड्डे मालकांवर योग्य ती कार्यवाही करावी जेणेकरून या गोष्टी बंद होतील , [ads id="ads1"]


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!