यावल (सुरेश पाटील) आमदार अमोल मिटकरी यांनी जाहीर सभेत ब्राह्मण समाजाबद्दल अपमानास्पद्ध अपशब्द वापरल्याने समस्त बाह्यण समाजाच्या भावना दुखावल्या या संदर्भात वेदशास्त्र संपन्न शामशास्त्री नाईक यांच्या नेतृत्वाखाली समस्त बाह्यण समाज संघ व परशुराम मंडळाच्या वतीने आमदार मिटकरी यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला तसेच त्यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन यावल तहसीलदार महेश पवार यांना देण्यात आले आहे.[ads id="ads1"]
यावल तहसील कार्यावर येथील समस्त बाह्यण समाज मंडळ आणी परशुराम मंडळच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आमदार अमोल मिटकरी यांनी ईस्लामपुर येथे जाहीर सभेत बाह्यण समाजाबद्दल अपशब्द वापरून समाजात जातीय द्वेष पसरवित असुन,त्यांच्या सभेत राज्याचे मंत्री ना.जयंत पाटील,ना.धंनजय मुंडे यांनी देखील त्यांच्या वक्त्यावर हसुन प्रतिसाद दिला त्यामुळे या कृतीतुन आमदार अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यास जणु या दोघांचे अनुमोदन असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.[ads id="ads2"]
त्यामुळे यावल येथे संपुर्ण बाह्मण समाज बांधवांच्या वतीने या नेत्यांचा देखील जाहीर निषेध करण्यात आला.आमदार अमोल मिटकरी यांच्या विरूद्ध समस्त बाह्यण समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल अजामिनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा आणी त्यांचे विधानमंडळ सदस्यत्व रद्द करण्यात यावे व बाह्यण समाजाला न्याय मिळवुन द्यावा असे निवेदनात म्हटले असुन,भविष्यात बाह्यण समाजाबद्दल अपशब्द वापरल्यास यावल शहरातील व परिसरातील बाह्यण समाज हा रस्त्यावर उतरून तिव्र स्वरूपाचे आंदोलन करेल अशा ईशारा सुद्धा या निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. यावल येथे तहसीलदार महेश पवार व निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार यांना वेदशास्त्र संपन्न शामशास्त्री नाईक यांच्या नेतृत्वाखाली सदरचे निवेदन देण्यात आले,यावेळी मोठया संख्येने ब्राह्मण समाजबांधव व महीला भगीनी उपस्तित होत्या.



