मुंबई : अक्षय्य तृतीयेनिमित्त महाआरतीचं नियोजन, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी तुर्तास रद्द केल आहे. उद्या राज्यात कुठेही आरती करू नका. कोणाच्याही सणात बाधा आणायची नाही, अशा शब्दांत राज यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक ट्विट केलं आहे .
राज ठाकरे यांचकार्यकर्त्यांना Tweet द्वारे संदेश
उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. [ads id="ads2"]आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण नेमकं पुढे काय करायचं, हे मी उद्या माझ्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडेन, तुर्तास येवढेच असं राज यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. [ads id="ads1"]



