कापूस विक्री मे महिन्यात व्हावी यासाठी रावेर ऍग्रो डीलर्सचे निवेदन ;कृषी अधिकाऱ्यांच्या पत्रानंतर संघटनेचा बंद मागे

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे)

यंदाच्या कापूस हंगामात बियाणे विक्री ०१जून ऐवजी मे महिन्यात व्हावी यासाठी रावेर ऍग्रो डीलर्स असोसिएशनतर्फे रावेरचे नायब तहसीलदार संजय तायडे,तालुका कृषी अधिकारी मयूर भामरे,पंचायत समिती कृषी अधिकारी एल ए पाटील आदीना निवेदन देण्यात आले.[ads id="ads1"] 

गेल्या ०३वर्षांपासून राज्यात कापसाच्या लागवडीसाठी ०१जूननंतर परवानगी देण्यात येते.मात्र रावेर तालुक्याला लागून असलेल्या मध्यप्रदेशच्या सीमेवर मात्र मे महिन्याच्या सुरुवातीस कापसाचे बियाणे उपलब्ध होते.रावेर परिसरातील शेतकरी १००% बागायती कापसाची लागवड करतात.त्यामुळे ०१जूनपर्यंत शेतकरी लागवडीसाठी थांबत नसून शेजारी मध्यप्रदेशात बियाणे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होत असल्याने तिथून आणून लागवड करतात.राज्यशासनाच्या अनुषंगाने बोन्ड अळीसाठी ०१जूनच्या निर्देश असले तरी मे महिन्याच्या अखेरपर्यंत ७० ते ८०% लागवड आमच्या परिसरात होऊन जाते.[ads id="ads2"] 

  या सर्व बाबी कृषी व्यवसाय करतांना त्रासदायक व आर्थिक नुकसानदायक ठरत आहेत.यासाठी कापसाच्या बियाण्याची १५ मे ते २० मे दरम्यान विक्री करण्याची परवानगी मिळावी याकडे लक्ष वेधण्यासाठी दि.१४ मे २०२२ रोज शनिवारी आमची प्रतिष्ठाने बंद ठेवण्याबाबत निवेदन देण्यात आले.यावेळी तालुकाध्यक्ष सुनील कोंडे,एकनाथ महाजन,डॉ जि एम बोंडे,चंद्रकांत अग्रवाल,युवराज महाजन,वामनराव पाटील,सुधाकर पाटील,प्रदीप महाजन,यादवेंद्र महाजन,विशाल पाटील,योगेश अस्वार,योगेश पाटील,गणेश महाजन आदी उपस्थित होते.


जिल्हा कृषिविकास अधिकारी वैभव शिंदे यांनी काढला तोडगा 

दरम्यान रावेर ऍग्रो डीलर्स असो.तर्फे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे व यावल असोसिएशनतर्फे मनोज वायकोळे यांनी जिल्हा कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांना ही निवेदन दिले.यावेळी त्यांच्या दालनात माफदा चे राज्याध्यक्ष विनोद तराळ, जिल्हा मोहीम अधिकारी विजय पवार,सुनील कोंडे,मनोज वायकोळे,प्रशांत पाटील,प्रमोद कोल्हे आदींच्या उपस्थितीत चर्चा केली.यावेळी श्री.शिंदे यांनी तात्काळ कृषी संचालक यांना सदर बंदबाबत अवगत करून देत सीमेवरील विक्रेत्यांच्या अडचणी सांगितल्या.व याबाबत तात्काळ कृषी संचालकांशी लेखी पत्रव्यवहार करीत संघटनेला आश्वस्त केले.संघटनेस लेखी पत्र देत बंद मागे घेण्याबाबत जिल्हा कृषिविकास अधिकारी वैभव शिंदे यांनी आवाहन केले.यास प्रतिसाद देत तालुका संघटनांनी १४ मे रोजीचा बंद मागे घेतला.याबद्दल त्यांनी संघटनेचे आभार मानले.किमान पुढीलवर्षी तरी मी महिन्यात बियाणे विक्रीस उपलब्ध व्हावे अशी अपेक्षा कृषी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!