महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या उपसचिवपदी तुषार वसंतराव महाजन यांना पदोन्नती

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या उपसचिवपदी तुषार वसंतराव महाजन यांना पदोन्नती

मनवेल ता.यावल (गोकुळ कोळी)-महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या उपसचिवपदी तुषार वसंतराव महाजन यांना नुकतिच पदोन्नती मिळाली आहे. या अगोदरही तुषार महाजन यांनी कृषी व गृह खात्यामध्ये अवर सचिव तसेच प्रशासनिक पातळी वरील पदांवर सेवा केलेली आहे.[ads id="ads1"] 

   तुषार महाजन हे साकळी ता. यावल येथील रहिवासी असून माजी जि. प.सदस्य वसंतराव महाजन व माजी जि.प.सदस्या सौ. विद्याताई महाराज यांचे चिरंजीव आहे. श्री.महाजन यांचा स्वभाव अतिशय विनम्र व आपल्या कामाशी एकनिष्ठ असा आहे. [ads id="ads2"] 

  शासनाच्या शिक्षण विभागाच्या उपसचिव पदावर तुषार महाजन यांना पदोन्नती मिळाल्याची बाब साकळी गाव- पंचक्रोशीसाठी शिरपेचात तुरा रोवणारी असून फार अभिमानाची व कौतुकास्पद अशी ठरली आहे.उपसचिव पदावर तुषार महाजन यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!