अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य किशोर मेढे यांना महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाने दिले निवेदन
जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) राज्यात मागील काही वर्षात जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न काही समाजविघातक प्रवुर्ती करीत असून राज्यात अनुसूचित जाती-जमाती वर अत्याचार वाढत आहे. यासाठी राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाने लक्ष देऊन दलीत आदिवासींवर होणारे अत्याचार थांबवावेत अशी मागणी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाने अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य किशोर मेढे यांच्याकडे केली आहे.[ads id="ads1"]
राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य किशोर मेढे हे जळगाव दौऱ्यावर आले असताना अजिंठा शासकीय विश्रागृहावर मुकुंद सपकाळे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या कार्यकर्ते, मागासवर्गीय सरपंच,ग्राम पंचायत सदस्य यांनी त्याची भेट घेऊन अनुसूचित जाती जमाती वर राज्यात वाढत असलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला.[ads id="ads2"]
पाचोरा तालुक्यातील चर्मकार समाजातल्या १२ वर्षीय चिमुकल्या मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन मिळावे व सदर खटल्याचे काम जलदगती न्यायालयात चालवावे अशी मागणी करण्यात आली.
या वेळी अनुसूचित जाती जमाती च्या सरपंच, ग्राम पंचायत सदस्य यांनी त्यांच्या अडचणी कथन करून केवळ जातीय आकसापोटी आम्हाला ग्रामपंचायत कामकाजात अडथळे निर्माण करून छळ केला जात असतो. यामागे अनुसूचित जाती जमाती ने सत्तेचे स्वप्न न पाहता केवळ चाकरी करावी अशी जातीय मानसिकता असल्याचे सरपंच व ग्राम पंचायत सदस्य यांनी आपल्या व्यथा अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य किशोर मेढे यांच्याकडे मांडल्या.
यावेळी झालेल्या चर्चेत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, भारत ससाणे,रमेश सोनवणे,चंदन बिऱ्हाडे,वाल्मीक सपकाळे,साहेबराव वानखेडे,सुरेश तायडे यांनी चर्चा केली. यावेळी अनुसूचित जाती चे जिल्ह्यातील सरपंच व ग्राम पंचायत सदस्य जय तायडे ( कोसगाव तालुका यावल),कृष्णा संदानशिव (अहिरे,ता.धरणगाव),अरुण शिरसाठ (हिंगोणे,ता.धरणगाव), बाळू शिरसाठ ( धरणगाव), सचिन बिऱ्हाडे(बंभोरी तालुका धरणगाव), रवींद्र नेटके (शिरसोली,जळगाव),नितीन सपकाळे(रायपुर,जळगाव),आदी उपस्थित होते.


