योगेश निकम यांच्या प्रयत्नाने ना.बच्चू कडू यांच्या हस्ते पिंप्री येथे विहारात मूर्ती स्थापना संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


पिंप्री ता.रावेर (विनोद कोळी) राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांना योगेश निकम यांनी तीन वर्षापूर्वी मूर्ती स्थापनेसाठी निमंत्रण दिलं होत बच्चू भाऊंनी सुद्धा लवकरच येईल अस आश्वासन दिलं होत परंतु कोरोना माहामारीमुळे कार्यक्रम पुढे पुढे ढकलत गेला शेवटी शुक्रवारी रात्री १२ वा.बच्चू भाऊ यांच्या हस्ते व अनिल भाऊ चौधरी आणि दत्तू भाऊ बोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.[ads id="ads1"] 

तर विधिवत पूजा बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे यांच्या हस्ते करण्यात आली.कार्यक्रम प्रसंगी बोलतांना बच्चू भाऊ म्हणाले की,तथागत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत कसे पोहचवता येतील ही जबाबदारी शिकलेल्या तरुण पिढीने घेतली पाहिजे.बाबासाहेबांनी सांगितलं की मी प्रथम भारतीय आणि शेवटी पण भारतीय च त्यांनी कधी म्हटल नाही की प्रथम बौद्ध आणि नंतर भारतीय.म्हणून जातीपेक्षा पहिले देश महत्वाचा असे सांगणारे बाबासाहेब खरंच खूप महान आहेत. [ads id="ads2"] 

  बाबासाहेबांनी विशिष्ट एका जातीपुरते काम केले असते तर obc पेक्षा sc ला जास्त आरक्षण दिलं असतं.आज मी चार वेळेस आमदार आणि आज मंत्री आहे तर हे फक्त बाबासाहेबां मुळेच आहे पुढे म्हणाले की गीता,कुराण,बायबल हे धर्मग्रंथ फक्त जाती पुरते मर्यादित आहे यांच्यावर देश चालत नाही तर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधनावर देश चालतो म्हणून संविधान हा आपला राष्ट्रीय ग्रंथ आहे. सर्वात शेवटी बच्चू भाऊ म्हणाले की,योगेश निकम हा ६ वर्षापासून प्रहार मध्ये काम करीत आहे परंतु तो कधी स्वतःसाठी माझ्याकडे आला नाही तसेच मला फोन किंवा sms केला नाही तर सर्वसामान्य लोकांच्या अडचणी घेऊनच येत असतो आणि फोन sms करीत असतो.तसेच त्याने हा कार्यक्रम लोक वर्गणीतून केला व घडवून आणला हेच त्याच मोठ यश आहे.

  या प्रसंगी उत्तर म.अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी,उत्तर म.संपर्क प्रमुख दत्तू भाऊ बोडके,जिल्हाप्रमुख राजेंद्र महाजन,शेतकरी जिल्हाप्रमुख सुरेश चिंधू पाटील,अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख फिरोज भाई शेख,युवा जिल्हाप्रमुख अविनाश पाटील,तालुका प्रमुख पिंटू भाऊ धांडे,अल्पसंख्याक ता.प्रमुख वसीम शेख,छोटू भाई,मनोज वरणकर व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या कार्यक्रमा प्रसंगी पंकज निकम,संदीप निकम,योगेश निकम,पिंटू गोमटे,प्रवीण निकम,पप्पू निकम यांनी परिश्रम घेतले तर सूत्र संचालन प्रा.सी.पी.गाढे सर व आभार तालुका युवा प्रमुख योगेश निकम यांनी मानले.

शेवटी जाता जाता बच्चू भाऊंनी योगेश निकम यांच्या घरी जाऊन भेट दिली व त्यांच्या आई वडिलांनी बच्चू भाऊंना डॉ.बाबासाहेबांची प्रतिमा भेट दिली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!