रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) वंचित बहुजन आघाडी या पक्षाची रावेर लोकसभा मतदार संघाची भुसावळ येथील शासकीय विश्राम गृह रेस्ट हाऊस येथे दिनांक 27 शुक्रवार दुपारी 12 वाजता वंचित बहुजन आघाडीचे जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय विनोद भाऊ सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला जळगाव जिल्हा प्रभारी व उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष ऍड. रविकांत वाघ यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुका नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने स्वबळावर लढविल्या जाणार असून कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागले पाहिजे निवडणूका ह्या केव्हाही लागू शकतात. [ads id="ads1"]
सर्व पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीची तयारी केली पाहिजे. जर का आपल्याला समविचारी पक्ष संघटना यांच्यासोबत चर्चा करून तसा जिल्हाध्यक्ष यांच्याकडे पाठवून ते माझ्यापर्यंत जिल्ह्याचा अहवाल पाठवून मी तो अहवाल महाराष्ट्र राज्य कमिटीकडे मंजुरीसाठी पाठवेल तसेच कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद बाजूला सारून निवडणुकीच्या कामाला लागावे आपण लवकरच जिल्हा परिषद गटातील निरीक्षकांचे बैठक घेणार असून प्रमुख पदाधिकाऱ्यांना निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन केले जाईल असे जळगाव जिल्हा प्रभारी ॲड. रविकांत वाघ यांनी कार्यकर्त्यांच्या सूचना दिल्या. अध्यक्षीय भाषणात वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे हे म्हणाले की, आपण सर्वांना ॲड. बाळासाहेब तथा प्रकाश जी आंबेडकर हे जसा आदेश देतील तोच आपण सर्वांनी पालन करायचा आहे. म्हणून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या प्रचार-प्रसारासाठी फिरले पाहिजे. [ads id="ads2"]
वंचित बहुजन आघाडी हा महाराष्ट्रातील तिसरा पर्याय असून इथले सत्ताधारी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. वंचित बहुजन आघाडी या पक्षाची झपाट्याने ताकद वाढत असून येथे विरोधात यांची झोप उडाली आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी संयमाने इथल्या वंचित समाजाला जागृत करून त्याला सत्तेत कसे बसता येईल याची रूपरेषा आखून प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. बाळासाहेब प्रकाश जी आंबेडकर यांनी वंचितांसाठी केलेले काम हे तमाम वंचितांपर्यंत पोहोचविले पाहिजे ही आपली जबाबदारी आहे. असे अध्यक्षीय भाषणामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे म्हणाले.
या आढावा बैठकीला महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदनाताई सोनवणे, महासचिव वंदनाताई आराक, जिल्ह्याचे महासचिव दिनेश भाऊ ईखारे, जिल्ह्याचे उपाध्यक्ष रफिक बेग, वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळूभाऊ शिरतूरे, महासचिव जरीना तडवी, प्रकाश सरदार, राजेंद्र बारी, याकुब भाई, बोदवड तालुका अध्यक्ष सुपडा भाऊ निकम, मुक्ताई नगर महासचिव दिलीप पोहेकर, भुसावळ माहासचीव गणेश इंगळे, भुसावळ शहर अध्यक्ष गणेश जाधव, शहर सचिव देवदत्त मकासारे, जिल्हा संघटक दीपक मेघे, शिवाजी टेंभुर्णीकर, बंटी सोनवणे, बाळू इंगळे, सुभाष इंगळे, प्रवीण इंगळे, प्रवीण मोरे, स्वप्नील सोनवणे, बंटी सोनकांबळे, शरद दाभाडे, मीरा वानखेडे, संगीता धोबी, चित्रा तायडे, शोभा सोनवणे, प्रमिला बोदवड, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.


