यावल (सुरेश पाटील) यावल शहरात विकसित भागात पाणीपुरवठा योजनेचा "फियास्को" झाल्यामुळे पाईप लाईन दुरुस्ती साठी खड्डे खोदून ठेवल्याने तसेच खोदलेले खड्डे तात्काळ बुजविले जात नसल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे,तसेच प्रत्येक प्रभागात अनेक ठिकाणी रस्ते साफसफाई आणि गटारी साफ-सफाई करण्यासह,ओला व सुका कचरा वाहतूक व त्यानंतर होणाऱ्या प्रक्रियेमध्ये मोठा घोळ सुरू आहे याकडे यावल शहरातील काही आजी-माजी नगरसेवकांसह अध्यक्ष तसेच विविध संघटना गप्प असल्याने आणि यावल नगर परिषद मुख्याधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल नगरपरिषदेतर्फे पूर्वेकडील विकसित भागात पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकामासह नवीन पाईप लाईन टाकण्यात आली.ही कोट्यावधीची कामे करताना संबंधित यंत्रणेने सोयीनुसार ठेकेदाराच्या नावाखाली टक्केवारी हडप केल्याने ठेकेदाराने त्याच्या सोयीनुसार आणि मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे काम न केल्यामुळे विकसित भागातील नागरिकांना पाणी पुरवठा होण्यास अडथळा निर्माण झाला आणि पाणीपुरवठा होत नाही.[ads id="ads2"]
त्यामुळे आता संबंधित ठेकेदार जागो जागी खड्डे खोदून पुन्हा पाईप लाईन दुरुस्तीचे काम करीत आहे,ही कामे करताना भर रस्त्यावर पुन्हा खड्डे खोदण्यात येत आहे,खड्डे खोदल्यानंतर आठ ते पंधरा दिवस पाईप लाईन व्हाल दुरुस्तीचे काम होत नसल्याने रहदारी करणाऱ्या नागरिकांना, वाहनधारकांना,रहिवाशांना मोठा अडथळा निर्माण होऊन त्रास सहन करावा लागत आहे.