रावेर प्रतिनिधी (विनोद कोळी) राज्य मंत्री ना.बच्च कडु यांच्या विचारांनी प्रेरित होऊन रावेर तालुक्यातील खानापूर गावच्या माजी सरपंच वंदनाताई सुधाकर बावस्कर यांनी प्रहार जनशक्ती पक्षांत प्रहार चे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षांत प्रवेश केला.[ads id="ads2"]
यावेळी प्रहार महिला जिल्हा प्रमुख नंदिनी चौधरी यांच्या सुचनेनुसार प्रहार जनशक्ती पक्षांचे जिल्हा प्रमुख राजेंद्र रामदास महाजन, शेतकरी आघाडी जिल्हा प्रमुख सुरेश चिंधु पाटील,युवक जिल्हा प्रमुख अविनाश पाटील, धिरज चौधरी, उप जिल्हा प्रमुख गणेश भाऊ बोरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रहार जनशक्ती पक्षांच्या महिला आघाडी तालुका प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली.प्रहार पदाधिकारी यांनी त्यांना भावी राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळीछोटु जहांगीरदार आणि असंख्य प्रहार कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.


