विश्रामजीन्सी शेती शिवारात नांगरतांना ट्रॅक्टर उलटल्याने अल्पवयीन चालकाचा मृत्यू

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 शेत नांगरत असतांना ट्रॅक्टर उलटल्याने 15 वर्षीय अल्पवयीन चालकाचा मृत्यू झाला. रविवार, 29 रोजी सकाळही ही घटना घडली. याबाबत रावेर पोलिसात  (Raver Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला.[ads id="ads2"]  

  रावेर तालुक्यातील विश्राम जिन्सी (Vishram Jinsi Taluka Raver) भागात घुबड्या जंगलामध्ये शेतकरी हरदास शंकर राठोर यांच्या शेतामध्ये शेताची मशागत दलसिंग घ्यालसिंग भिलाला (15) हा अल्पवयीन चालक ट्रॅक्टरद्वारे करीत होता मात्र वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर शेताला लागून असलेल्या नाल्यामध्ये जाऊन पलटी झाले. ट्रॅक्टरखाली दबले जावून चालक दलसिंग भिलाला जागीच ठार झाला. शेत मालक हरदास राठोर यांच्या खबरीवरुन रावेर पोलिस स्टेशनला(Raver Police Station)  गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक (API) विशाल सोनवणे व पोलिस सहकारी करीत आहे.


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!