Dharangaon : पिंप्रीत पाणी मिळेना, महिला वर्ग तक्रार करून पाणी पाजणार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


🔹नारीशक्ती पाण्याच्या होत असलेल्या त्रासा बद्दल ' संबंधितांचा ' सत्कार करणार 

धरणगाव प्रतिनिधी (पी.डी.पाटील सर)

पिंप्री खु ता धरणगाव - पिंप्री खु. येथे पाण्याचा मुबलक साठा असताना नागरिकांना नाहक पाण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागत असून नागरिकांना पाण्यासाठी त्रास होत आहे. दरम्यान पिंप्री गावात पाण्याचा तुटवडा नसताना देखील जाणीवपूर्वक काही प्रभाग मध्ये सकाळची वेळ असताना देखील नागरिकांना पाण्यासाठी ताटकळत ठेवण्यात येत आहे. हे पाहता नागरिकां मध्ये प्रचंड रोषाचे वातावरण निर्माण होत असून येत्या काळात महिला वर्ग आंदोलन करून नागरिकांचे हाल केल्या बद्दल संबंधितांचे पुष्पहार देऊन सत्कार करणार आहेत.[ads id="ads1"] 

प्रश्नावर बोलण्यासाठी सरपंच महोदयांनी संबंधित कर्मचारी यांना बोलावले असता त्यांनी चाबी फेकण्याची धमकी दिली या मुळे नागरिकांचा रोष अजून तीव्र वाढला. [ads id="ads2"] 

  असल्या लोकांवर शासनाचा काही वचक आहे का ? स्थानिक अधिकारी यांची काही जबाबदारी आहे का ? लोकांना मुबलक पाणी असतांना जाणीवपूर्वक त्रास देणे हा अजेंडा आहे का ? असले प्रश्न उपस्थित विचारत होते. दरम्यान संबंधित पाण्याच्या होत असलेल्या त्रासाबद्दल ग्रामपंचायत , व प्रशासनाने नेमून दिलेले स्थानिक अधिकारी यांना निवेदन देणार असल्याचे कळते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!