रेशनकार्ड तयार करून देण्यासाठी चारशे रुपयांची लाच मागून ती स्वीकारणार्या खाजगी पंटराला जळगाव एसीबीच्या पथकाने जळगाव तहसील कार्यालयाच्या बाहेर लाच स्वीकारताच रंगेहाथ अटक केली. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास हा सापळा यशस्वी करण्यात आला. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. पराग पुरूषोत्तम सोनवणे (जळगाव) असे अटकेतील लाचखोर इसमाचे नाव आहे.[ads id="ads1"]
जळगाव शहरातील एका तक्रारदाराकडे पराग सोनवणे याने रेशनकार्ड तयार करून देण्याच्या मोबदल्यात चारशे रुपयांची लाच मागितल्याने एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली होती. [ads id="ads2"]
लाच पडताळणी झाल्यानंतर सापळा रचण्यात आला व सायंकाळी साडेसहा वाजता सोनवणे यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात लाच स्वीकारताच आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. हा सापळा जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील, निरीक्षक संजोग बच्छाव, निरीक्षक एन.एन.जाधव व सहकार्यांनी यशस्वी केला.


