माहिती अधिकार कार्यकर्ता अनिल देवराव ओचावार यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी - रावेर तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची मागणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 रावेर तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघातर्फे माहिती अधिकार कार्यकर्ता अनिल देवराव ओचावार यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करुन त्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात यावी यासाठी रावेर च्या तहसिलदार उषाराणी देवगुने यांना निवेदन देण्यात आले.[ads id="ads1"] 

निवेदनात यवतमाळ जिल्ह्यातील घाटजी तालुक्यातील पारवा या गावातील माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल देवराव ओचावार १५ मे रोजी मध्यरात्री अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली असल्याचे म्हटले असुन सदर हत्या माहिती अधिकार अधिनियम नुसार माहिती मागितली म्हणुन सुड भावनेने झाली असल्याचे पोलीस तपासातून व प्रसारमाध्यमातून समोर आले असल्याचे म्हटले आहे तसेच सदर घटना ही धक्कादायक असुन महाराष्ट्राच्या प्रागतिक परंपरेला काळीमा फासणारी असल्याचे म्हटले आहे.[ads id="ads2"] 

माहिती अधिकार कार्यकर्ते यांचे मनोधैर्य खच्चिकरण करणारी घटना असुन यासाठी सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना सहा महिन्याच्या आत कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, याप्रकरणातील सामील असू शकणारे व अपराध्याला चिथावणी देणारे सरकारी अधिकारी व सूत्रधार यांच्या देखील मुसक्या अवळून त्यांची चौकशी व्हावी, माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्यासाठी धोरणात्मक उपाय योजना अमलात आणून शासनाने या संबंधी कडक उपाय योजना कराव्यात तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते यांना आवश्यक येथे तडक पोलीस संरक्षण मिळावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

निवेदनावर महेशचंद्र लोखंडे रावेर तालुका अध्यक्ष माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघ, आर डी वाणी  माहिती अधिकार कार्यकर्ते. भागवत रामदास चौधरी इ. हजर होते. यांच्या सह्या आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!