चक्कर येऊन पडल्याने रावेर तालुक्यातील तांदलवाडी च्या तरुणाचा जागीच मृत्यू

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील तरूणाला अचानक चक्कर येवून खाली पडल्याने जखमी होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.प्रतिक किशोर कोळी (वय १९)असे मृत तरुणाचे नाव असून येथील वाल्मिक नगर मधील रहिवासी किशोर कोळी यांचा तो एकूलता मुलगा होता.[ads id="ads1"] 

सविस्तर वृत्त असे की प्रतिक कोळी हा शेतमजूरीचे काम करत असे मंगळवारी आपल्या मित्राकडे हळदीचा कार्यक्रम असल्याने तेथे हजर होता.तेथेच मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास अस्वस्थ वाटून आल्याने अचानक चक्कर येऊन खाली पडल्याने जखमी झाला. त्यास स्थानिक दवाखान्यात दाखल केले तेथून रुग्णवाहिकेने सावदा येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.[ads id="ads2"] 

  याबाबत विशाल सोनवणे यांच्या खबरीवरून निंभोरा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्रतिकचा मृत्यू हा उष्माघाताने झाला की चक्कर येऊन पडल्याने झाला याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.मयताचे उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे शवविच्छेदन करून बुधवारी दुपारी तांदलवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत प्रतिकच्या पश्चात आई,वडील व मोठी बहीण असा परिवार आहे.त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!