रावेर तालुक्यातील कुसुंबे आदिवासी कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चेअरमन पदी शहानूर तडवी व व्हा.चेअरमन पदी चांगो भालेराव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.[ads id="ads2"]
आज दि.१८/५/२०२२ रोजी संस्थेच्या कार्यालयात सकाळी १०:०० वाजता अध्यासी अधिकारी जितू पाटील यांच्या अध्यक्षते खाली निवडणूक घेऊन चेअरमन शहानूर इब्राहिम तडवी यांची तर व्हा. चेअरमन पदी चांगो लहानु भालेराव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गावकरी कुसुंबे, लालमाती, आभोडा यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून हार्दिक अभिनंदन केले.सदर कार्यक्रमास सचिव. जगदीश घेटे यांनी सहकार्य केले.


