रावेर येथे वंचित बहुजन आघाडी या. पक्षाच्या वतीने एड. माजी खासदार बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक 20 मे सकाळी 10 वाजता तहसिल कचेरी पोलीस स्टेशनच्या जवळ गरीब व गरजू पावरी समाजाच्या महिला व पुरुषांना उन्हाळ्यासाठी चपलांचे वाटप करण्यात आले वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू भाऊ शिरतुरे यांनी भिमसिंग बारेला यांना चप्पल दिली तसेच सयानी बाई बारेला रे तली बाई बारेला सावरी बाई आशाबाई बारेला सेवंती बाई बारेला गुणाबाई बारेला गुड्डी बाई बारेला बजार्या. बारेला सोनू सिंग बारेला रामसिंग इत्यादी पावरी समाजाच्या महिला व पुरुषांना चपलांचे वाटप करण्यात आले.[ads id="ads2"]
याप्रसंगी रावेर तालुका अध्यक्ष बाळू भाऊ शिरतुरे, तालुका उपाध्यक्ष सुरेश अटकाळे, सलीम शहा, तालुका सचिव अर्जुन वाघ, फुले शाहू आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे, भिमराव वाघ, कंदरसिंग बारेला, राजेंद्र अवसरमल, बाळू तायडे, नितीन तायडे, चिम्या बारेला, नबु शहा, सुरेश बारेला, जाकीर शेख, भीमराव वाघ वाघोदा बुद्रुक, अत्तर शेख, मुकेश बारेला इत्यादी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


