ऐनपुर प्रतिनिधी (विजय अवसरमल) सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथील विद्यार्थी विकास विभागामार्फत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने हे होते.
त्यांनी विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचा विकास होण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला पाहिजे असे त्यांच्या मनोगतात सांगितले. विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ.विनोद रामटेके यांनी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन केले. सांस्कृतिक कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी संगीत खुर्ची ही स्पर्धा घेऊन मनोरंजन केले.[ads id="ads2"]
या कार्यक्रमाला महिला विकास अधिकारी डॉ. नीता वाणी, डॉ. रेखा पी पाटील, डॉ डी बी पाटील, डॉ एस बी पाटील, डॉ.एस.एन. झोपे प्रा एस.पी. उमरीवाड,प्रा संकेत चौधरी व प्रा.पूजा कुमावत हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विनोद रामटेके यांनी केले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.व कार्यक्रमाचे आभार प्रा. एस पी उमारीवाड यांनी केले.



