रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) ऑगस्ट २०२० ते २०२२ या दिड वर्षात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पंचायत समिती रावेर येथे झालेला जवळपास दीड कोटी रुपयांचा घोटाळा रावेर पंचायत समितीचे कर्तव्य दक्ष गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी उघडकिस आणल्याने रावेर पोलिस स्टेशन (Raver Police Station) मध्ये दोन संशयीत आरोपी कंत्राटी गट समंवयक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.[ads id="ads1"]
हे जरी सत्य असले तरी प्रत्यक्षात पूर्ण सत्य नाहीच कारण कंत्राटी कामगार कोणत्या तरी राजकीय पक्षांच्या नेत्याच्या वरदहस्त असल्याशिवाय व प्रशासकीय अधिकारी यांच्या मदतीशवाय एवढा अपहार करणे शक्यच नाही व दिड कोटी ही रक्कम फक्त आगस्त २०२०पासूनच असून सदर कंत्राटी कामगार हे सन २०१२ पासून पंचायत समिती रावेर येथे नियुक्तीवर असल्याने यांच्या नियुक्ती पासून सखोल चौकशी झाल्यास हा अपहाराचा आकडा कोटींच्या घरात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. [ads id="ads2"]
त्यामुळे या घोटाल्याचे मास्टरमाइंड, या आरोपीचे राजकीय गॉडफादर व खेड्यापाड्यातून प्रकरणे आणुन देणारे एजंट व दलाल यांचा गरिबांची संडास खाणारा खरा चेहरा जनतेसमोर येणे कामी सदर शौचालय घोटाळ्याची सन २०१२ पासुन आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करणे कामी व विधी मंडळ स्तरावरून योग्य ती कारवाई करणे कामी दिनांक ५ मे रोजी बहुजन समाज पार्टीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रदिप सपकाळे व रावेर तालुका काँग्रेस अनु. जाती विभागाचे तालुका अध्यक्ष सावन मेढे यांनी रावेर विधानसभा मदारसंघातील आमदार आदरणीय शिरीष दादा चौधरी यांची भेट घेऊन स्वतंत्र निवेदन देऊन मागणी केली यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप साबळे, संतोष पाटील, धुमा भाऊ तायडे उपस्थित होते.


