यावल (सुरेश पाटील) यावल नगरपरिषद हद्दीत नवीन वसाहतीत गणपतीनगर,आयेशा नगर,तिरुपतीनगर,चांदनगर व इतर नवीन वसाहतीला लागून असलेल्या नाल्याची साफ-सफाई करून कीटक नाशकांची फवारणी करण्यासाठी रावेर यावल विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष मो.फैजान अब्दुल गफार शहा यांनी आज यावल नगरपालिकेत लेखी निवेदन देऊन मागणी केली. [ads id="ads1"]
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,यावल नगरपालिका हद्दीत गणपतीनगर,आयेशानगर,तिरुपतीनगर,चांदनगर,व इतर नवीन वसाहतीत तिरुपती नगर,भास्कर नगर ते गणपती नगर व आयेशा नगर,चांदनगर होऊन अलाउद्दीन नगरला जोडणारा नाला आहे,ज्यात दुर्गंधीयुक्त घाण पाणी स्थानिक क्षेत्रातील गटारीतुन येत असते. एक वर्षापासून घाण पाणी साचून आहे या ठीकाणी नाल्याची सफाई झाली नाही,नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे नाल्याची दुर्व्यवस्था झाली आहे.[ads id="ads2"]
स्थानिक लोकांना डास,मच्छर,दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.आयेशानगर,आयेशा मस्जिद ला लागून हे नाला आहे सफाई न झाल्या मुळे नमाज पठणासाठी येणारे मुस्लीम बांधवांना सुद्धा खुप त्रास सहन करावा लागत आहे.यावल नगरपालीकाचे या ठिकाणी साफ- सफाई कडे दुर्लक्ष झाले आहे सदर निवेदनाद्वारे यावल नगर पालिकेला स्वच्छ भारत अभियानाची आठवण करून देत आहे.सदर नाल्याची साफ-सफाई करणे.
नागरिकांच्या आरोग्य हिताच्या दृष्टिकोनातून तसेच साथीचे रोग पसरू नये म्हणून आवश्यक आहे.तरी आपण तात्काळ सदर नाल्याची स्थानिक पाहणी करून त्याची लवकरात लवकर साफ सफाई करावी अशी मागणी रावेर यावल विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष मो.फैज़ान अब्दुल गफ्फार शाह यांनी व मुसतलीक शेख,शकील तडवी, जाबिर कुरेशी,रिजवान कुरेशी, नजीफ शेख,दानिश शेख अनिस शेख, इत्यादी सदस्य व नागरिकांनी केली आहे.


