ऐनपूर प्रतिनिधी (विजय एस अवसरमल)
रावेर तालुक्यातील ऐनपुर (Ainpur Taluka Raver) येथे दिनांक ०५/०५/२०२२ रोजी येथिल रामदेव बाबानगर (वजारी वाडा ) वाल्मीक नगरात रात्री ८ च्या सुमारास भिमसिंग जगदीश पवार वय २८ हा फिरत असताना रामदेव बाबा नगर येथील पन्नालाल सोमा कोरकू वय ( ५५ ) या दोघांचे टपरीच्या उधारी चे एकशे तीस रुपयाच्या पैशावरून वाद होऊन या वादात भिमसिंग जगदिश पवार याचे गुप्तांग पन्नालाल सोमा कोरकू याने पिरगळून टाकले.त्यामुळे भिमसिंग पवार याचा जागीच मृत्यू झाला तर आरोपी पन्नालाल कोरकू घटनास्थळावरून पसार झाला.[ads id="ads1"]
सविस्तर वृत्त असे की, दि. ५ मे च्या रात्री ८ वाजता पन्नालाल कोरकू याची टपरी असून त्या टपरीचे उधारी चे एकशे तीस रुपये भिमसिंग पवार याच्या कडे होते. ह्या देण्या घेण्याच्या वादात पन्नालाल कोरकू ( वय ५५ ) याने भिमसिगं पवार ( वय २८ ) याचे गुप्तांग पिरगळून टाकले त्यास तात्काळ रावेर येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.[ads id="ads2"]
मात्र संशयित आरोपी पन्नालाल कोरकु फरार आहे. या घटनेची दखल घेऊन फैजपूर विभागीय पोलिस अधिकारी (Faijpur DYSP) यांनी घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.
☞हेही वाचा :- ऐनपुर येथे मरीमाता यात्रोत्सव साजरा; बारा गाड्यांची परंपरा कायम
सदर घटनेचा तपास निंभोरा पोलीस स्टेशन (Nimbhora Police Station) चे स पो नि गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखालील पो. हे. कॉ. ज्ञानेश्वर चौधरी, स्वप्नील पाटील, अब्बास तडवी हे करित आहे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


