यावल नगरपालिका इंजिनीयर, ठेकेदार यांच्यावर कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


पाणी पुरवठ्याचा झाला "फियास्को"

यावल (सुरेश पाटील) यावल नगरपरिषद इंजिनियर व ठेकेदार यांच्यावर कार्यवाही होणेबाबत जिल्हधिकाऱ्याकडे तक्रारी अर्ज करुन कोणतेही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे सदर प्रकरणांची चौकशी होऊन कार्यवाही करणेबाबत यावल शहरातील राजेश कडू महाजन यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पुन्हा दि.5मे2022 रोजी पुन्हा लेखी तक्रार केली.[ads id="ads1"] 

             दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे की,माहिती अधिकार कायद्यान्वये यावल नगर परिषद कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार आढळुन आले की नविन वस्ती मध्ये डांबरी रस्ते व गटारी हे इंस्टेमेंट नुसार झालेले नाही व सदरील कामे ही बोगस रित्या झाल्याचे आढळुन येत आहे व ईस्टेमेंट मध्ये अंदाजीत7 लक्ष रुपयाचे कॉक्रेटीकरण आहे मात्र ते काम कुठे झाले याची माहिती मागितली असता नगरपरिषदेने मला आज पर्यंत माहिती दिलेली नाही तसेच सदर कामाची वर्क ऑर्डर(कार्यआदेश)हा दि. 17/12/2021ला देण्यात आला. [ads id="ads2"] 

आणि त्याच कामामध्ये सदर कामाचे बिल दि.27/1/2022 ला रक्कम रुपये35.64,910/- एवढे बिल ठेकेदाराना अदा केले आहे,साधारण30ते 35 दिवसांमध्ये साधारण35लक्ष रुपयांचे बिल अदा करून टाकले आहे.म्हणुन सदर काम बोगस रित्या झाल्याचे आढळुन येत आहे,तसेच नविन वस्ती मध्ये पाईपलाईन टाकण्याचे

काम साधारण3कोटी65लक्ष रुपयाचे आहे,सदरील काम सुद्धा बोगस रित्या झालेले आसताना गरपरिषेदने कामाचे बिल अदा केरून टाकले आहे.सदर कामाच्या ठेकेदाराने बिल धावते देयक मागणी करत असतांनाम्ह टलेले आहे की,काम प्रगती पथकावर चालु आहे म्हणुन धावते देयक मिळावे तसेच ठेकेदार यांनी नगरपालिकेला वेळोवेळी पाईप प्रेशर टेस्टींग होऊन न.पा. पाणीपुरवठा विभाग प्रमुख तसेच अभियंता यांचे समक्ष होऊन केलेली आहे.

  महोदय सदर कामाची टेस्टींग झालेली आहे असे यांचे म्हणणे आहे मात्र आज पर्यंत नागरीकांना ऐन उन्हाळ्यात नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे व सदर ठेकेदार व इंजिनिअर हे दोन हिन्यापूर्वी झालेल्या नविन रस्ता/रोडला फोडुन त्यामध्ये व्हॉल टाकणे,पाईप लाईन लिकेज काढणे असे काम करत आहे व नगरपालिकेच्या लाखो रुपयांच्या नविन रस्त्यां खोदून रस्त्याची दयनीय अवस्था करून टाकली आहे म्हणुन महोदय सदर प्रकरणांमध्ये ठेकेदार व इंजिनिअर यांनी जनतेला वेठीस धरुन नगरपालिकेचे आर्थिक नुकसान केले आहे,म्हणुन संबंधित ठेकेदार व इंजिनिअर यांच्यावर कायदेशिर कार्यवाही करावी.तसेच आपण जी कार्यवाही कराल त्याची एक प्रत मला माहिस्तव मिळावी असे सुद्धा दिलेल्या निवेदनात राजेश कडू महाजन यांनी म्हटले आहे या निवेदना संदर्भात जिल्हाधिकारी जळगाव काय कारवाई करतात? याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.

         विकसित भागात पाणीपुरवठा करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चून पाण्याची टाकी,पाईप लाईन,आणि रस्ते इत्यादी कामे करण्यात आली परंतु यावल नगरपरिषदेने ठेकेदारांमार्फत नियोजनपूर्वक आणि उत्कृष्ट प्रतीची कामे न केल्यामुळे विकसित भागातील पाणीपुरवठ्याचा "फियास्को" झाल्याचे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!