शहरातील मंडळी वळली गावाकडे...
यावल (सुवर्ण दिप वृत्तसेवा) जळगांव जिल्ह्यात जुगार अड्डे बंद असताना "दहिगांव" ता.यावल येथे मोठ्या प्रमाणात सावदा,रावेर,भुसावळ,चोपडा,यावल येथील जुगार खेळणारी मंडळी मोठ्या प्रमाणात वळु लागली आहेत.तसेच अनेक अवैध धंदे राजरोस पणे सुरू असुन त्यामुळे अनेक कुंटुब उध्वस्त होत आहे.दहिगांव पोलीस स्टेशन चौकी पासुन काही अंतरावर खुल्या आम शेतात अवैध धंदे जोमात आहेत.[ads id="ads1"]
संध्या उन्हाळ्याचे दिवस असताना बरेच शेतकरी शेती नांगरुण पडुन देत आहे. परंतु या नांगरुण शेतीचा उपयोग शेती मालकाला न विचारता कोणाच्याही जुगारी शेतात जुगार अड्डे बसवत आहे.तरी देखील पोलिस प्रशासन माञ बघायची भुमिका घेत असुन कारवाई का करत नाही.[ads id="ads2"]
असा प्रश्न सामान्य नागरिक करीत आहे.तसेच हे अवैध धःदे करणाऱ्यांवर कुणाचा आशीर्वाद आहे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे .
तसेच यावल तालुकातील बरेच गावामध्ये "जुगार अड्डे" वर छापे पडले आहेत परंतु आजपर्यंत दहिगांव येथे जुगारी अड्डे वर पोलिस छापा पडला नाही आहे. हे विशेष आहे


