Raver : ऐनपूर येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला सोमवारपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 ऐनपूर प्रतिनिधी (विजय एस अवसरमल)

याबाबत सविस्तर वृत्त असे की काल एकशे तीस रुपयांच्या उधारी साठी आरोपी पन्नालाल कोरकू याचे भीमसिंग जगदीश पवार याच्यासोबत शाब्दिक बाचाबाची होऊन त्याचे पर्यावसान वादात झाल्याने पन्नालाल सोमा कोरकू याने भिमसिंग पवार याच्या गुप्तांगाला पिळून टाकले त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता. [ads id="ads2"]  

  रात्री उशीरा आरोपीला अटक करण्यात आली निंभोरा पोलीस स्टेशन येथे पन्नालाल कोरकू यांच्यावर कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आज सकाळी त्याला रावेर येथील न्यायालयात हजर केले असता सोमवार पर्यंत दि. 9/5 /2022 पर्यंत पोलीस कोठडीचे आदेश न्यायालयाने दिले आहेत सदर घटनेचा तपास निंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्‍वर चौधरी, स्वप्नील पाटील, अब्बास तडवी हे करीत आहेत.


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!