वाळू माफियानी दिली पोलीसांना ट्रॅक्टरची धडक... पोलीस हवालदार जखमी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

ऐनपुर प्रतिनिधी (विजय एस अवसरमल)

 ऐनपुर येथून जवळच विटवे शिवारात वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पोलीस हवालदार बापू पाटील यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता ट्रॅक्टर ड्रायव्हर ने ट्रॅक्टर न थांबवता त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर आणून जखमी केले.[ads id="ads1"] 

सविस्तर वृत्त असे की ऐनपुर येथील ट्रॅक्टर ड्रायव्हर प्रविण श्रावण चव्हाण हा दिनांक१४/५/२२ रोजी  ११ . 30 च्या सुमारस विटवे शिवार भोकर डोह तापी नदी पात्रात पातोंडी गावापासुन दोन किलो मिटर अलीकडे वाळुची चोरीटी वाहतुक करताना विटवा बिट अमलदार पो हे कॉ बापु धनराज पाटील यांना आढळुन आला परतु पोलीस हे . कॉ बापु पाटील यांनी ट्रक्टर अडवण्याचा प्रयत्न केला.[ads id="ads2"] 

  परंतु ट्रॉक्टर न थांबवता ड्रायव्हर ने ट्रॅक्टर बापु पाटील यांच्या अंगावर घेऊन यांना धडक दिली त्यात बापु पाटील यांच्या डाव्या  माडीला व कंबरेला मार लागुन जखमी झाले ड्रायव्हर ने ट्रॅक्टर घेऊन पलायन केले पुढे पातोंडीत ' ड्रायव्हरने त्याच्या दोघ भाऊ सुनिल चौहान व राकेश यांना बोलवुन घेतले व या दोघांनी बापु पाटील यांच्या सोबत हुज्जत घातली व धक्काबुक्की केली पो. हे . कॉ . २७ ०६  बापु धनराज पाटील यांनी निभोरा पोलीस स्टेशनला फीर्याद दिली गु.न . ८६/२२ . भा . द . वि.कलम ३०७.३५३.३३२.४२१.५०४.५०६.१८४. गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे व ट्रॅक्टर ताब्यात घेऊन आरोपी प्रविण श्रावण चव्हाण सुनिल श्रावण चव्हाण राकेश श्रावण चव्हाण सर्व राहणार ऐनपूर ता रावेर व ट्रॅक्टर पो. स्टे . मध्ये ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास निंभोरा पोलीस स्टेशन चे स.पो.नि.शितल कुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर चौधर स्वप्नील पाटील ईश्वर चव्हाण हे करीत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!