Yawal : साकळी येथील वाडेश्वर मंदिरातून घंटा चोरीस

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल प्रतिनिधी (गोकुळ कोळी) यावल तालुक्यातील साकळी येथील मनवेल रोडवरील श्री. वाडेश्वर मंदिरातील भल्या मोठ्या आकाराची पितळी घंटा चोरीला गेल्याची संतापजनक घटना घडली आहे. यामुळे मंदिराचे जवळपास नऊ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मंदिराच्या सुरक्षेबाबत भाविकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून खळबळ उडाली आहे.[ads id="ads1"] 

या मंदिरात प्रवेशद्वाराच्या समोरील भागात गणपतीच्या मूर्तीजवळ भली मोठी जवळपास साडेआठ ते नऊ किलोची पितळी घंटा लावलेली होती.मंदिरातील घंटा चोरीस गेल्याचे १४ रोजी सकाळी भाविक मंदिरात आले. या घटनेबाबत पोलिसात तक्रार करणार असल्याचे मंदिर प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.[ads id="ads2"] 

चोरीस गेलेल्या घंटेची किंमत जवळ पास साडेआठ ते नऊ हजार रुपयापर्यंत होती. असल्याचे सांगण्यात आले. या अगोदरही मनवेल रोड वरील अजून दोन ठिकाणच्या देवस्थानावरील पितळी घंटा चोरीस गेल्याच्या घटना घडलेल्या आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!