वरणगांव फॅक्टरीत हलगर्जीपणामुळे बालिकेचा मृत्यू

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


संजय खन्ना यांची चौकशीची मागणी 

भुसावळ तालुक्यातील वरणगांव फॅक्टरी मधील बाळू पांडुरंग इंगळे सुशील नगर भागातील रहिवाशी यांच्या राहत्या घरी लग्न होते.बुद्ध पौर्णिमा निमित्त नवरदेव बुद्ध विहारात आला व सोबत पाहुणे मंडळी व बालगोपाल आले. [ads id="ads1"] 

  नवरदेव काही वेळ थांबल्याने विहारात लावलेले झोके एक बालिका खेळत असतांना अचानक झोका खाली पडल्याने जखमी झाली व उपचारा दरम्यान मृत्यू झाला. वरणगांव फॅक्टरीच्या हलगर्जीपणामुळे बालिकेचा मृत्यू झाला. या घटनेची चौकशीची करण्याची मागणी समाजिक कार्यकर्ता संजय खन्ना यांनी केली.[ads id="ads2"] 

सविस्तर वृत्त असे की , दिनांक १६/०६/२०२२ बुद्ध पौर्णिमा होती व त्यात वरणगांव फॅक्टरी मधील बाळू पांडुरंग इंगळे सुशील नगर भागातील रहिवाशी यांच्या राहत्या घरी लग्न होते . नवरदेव विहारात आल्याने सोबत पाहुणे मंडळी व बालगोपाल होते . लग्नासाठी अरुण सावळे यांचा परिवार व त्यांची ७ वर्षाची बालिका समिक्षा अरुण सावळे ही आली होती . दुपारी दिड ते दोन वाजेच्या दरम्यान समिक्षा बुद्ध विहारात झोका खेळण्यासाठी गेली असता अचानक झोका तुटून खाली पडल्याने समिक्षा ही गंभीर जखमी झाली.

दुपारी ०२.०० वाजेला वरणगांव ऑडन्स फॅक्टरी मेन हॉस्पिटलला समिक्षाला प्राथमिक उपचार करून दुपारी ०२.२५ वाजेला वरणगांव ऑडन्स फॅक्टरीच्या रुग्णवाहिकेत भुसावळ मधील डॉ . मानवतकार हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले. उपचार दरम्यान बलिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परीसरात खळबळ उडाली आहे.

सदरील घटना वरणगांव ऑडन्स फॅक्टरीच्या हलगर्जीपणामुळे घडली . जर वरणगांव ऑडन्सस फॅक्टरी मधील बुध्द विहारात लावलेल्या झोक्यांचे फौंडेशन व्यवस्थित लावण्यात आले असते तर आज रोजी समिक्षाला आपले प्राण गमविण्याची वेळ आली नसती ही वेळ वरणगांव ऑडन्सस फॅक्टरीच्या हलगर्जीपणामुळे आली असून बुद्ध विहारात लहान मुलांचे खेळण्याचे जे साहित्य लावण्यात आले आहे.

   त्या संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करावे तसेच ठेकेदार व घटनेशी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय खन्ना यांनी केली . तसेच सावळे परिवारावर दुःखांचा डोंगर उभा करणाऱ्यांना कठोर शिक्षा घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे . तसेच वरीष्ठ अधिकारी व पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन चौकशी करून गुन्हे दाखल करावे. अशी मागणी होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!