मानवतावादी साहित्याची प्रस्थापना करणारे साहित्य दलित साहित्य या विषयावर आयोजित सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात प्रमुख वक्ता म्हणून भाषण करतांना वाघ बोलत होते सदर संमेलन जळगाव येथील कांताई सभागृहात दिनांक 7 व 8 मे रोजी संपन्न झाले.[ads id="ads2"]
आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात जयसिंग वाघ पुढं म्हणाले की मानवतावादी साहित्य हे ईश्वर ,ईश्वरी संकेत , स्वर्ग , नरक , आत्मा नाकारते तर मानवाला केंद्रबिंदू मानून इहवाद , व्यक्तीवाद , बुद्धिप्रामाण्यवाद स्वीकारते तेंव्हा ईश्वर , ईश्वरी संकेत यावरील साहित्य हे मानवतावादी साहित्य ठरू शकत नाही हे आपण समजून घ्यावे , दलित साहित्याने अतिशय कमी कालखंडात वैश्विक रूप धारण केले ही मोठी क्रांतिकारक घटना आहे .
अध्यक्षस्थानावरून भाषण करतांना प्रा डॉ म सु पगारे यांनी विवीध दाखले देत दलित साहित्याने वेगवेगळ्या क्षेत्रात कशी उंची गाठली आहे याचे विश्लेषण केले , मानवतावादी तत्वे स्विकारल्या खेरीज जे साहित्य लिहिले जात असेल ते साहित्यच ठरू शकत नाही.
सुरवातीस माजी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र रायसिंग यांच्या हस्ते डॉ पगारे व वाघ यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कवी डी बी महाजन यांनी केले.
संमेलन अध्यक्ष प्रभा गणोरकर , उद्घाटक डॉ विश्वनाथ शिंदे , संयोजक सतीश जैन आदिंसह कवी , लेखक मोठ्या संखेने उपस्थित होते



