रावेर येथे झालेल्या या विवाह सोहळ्यात अध्यक्ष स्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जळगाव जिल्हाध्यक्ष शैलेंद्र जाधव हे होते तर उदघाटन उद्योजक दीपरत्न तायडे होते. दीप पूजा उप अधीक्षक भूमी अभिलेख राजू घेटे, विशाल गजरे, संतोष तायडे यांच्या हस्ते करण्यात आली.[ads id="ads2"]
त्रिशरण, पंचशील भन्ते अचरानंद महाथेरो भुसावळ,यांनी घेतले. प्रमुख पाहुणे म्हणून आ.शिरीष चौधरी , जि.प. अध्यक्षा सौ रंजना पाटील, श्रीराम उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीराम पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, माजी नगराध्यक्ष हरीश गणवाणी, पं.स. सदस्य दीपक पाटील, सुरेश नाईक, शेखर बडगे, डॉ सुरेश पाटील, सर्फराज तडवी, समाज कल्याण विभागाचे आर सी पाटील, व तालुका समनव्यक शिला अडकमोल, रावेर शिक्षण संवर्धक संघ चेअरमन प्रकाश मुजुमदार, आर पी आय जिल्हाध्यक्ष राजु सूर्यवंशी, जनक्रांती मोर्चा प्रदेश अध्यक्ष मुकुंद सपकाळे, संविधान आर्मी संस्थापक जगन सोनवणे, नगरसेवक जगदीश घेटे, ऍडव्होकेट योगेश गजरे, वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, वंचीत बहुजन आघाडीचे रावेर ता. अध्यक्ष बाळु शिरतुरे,निंभोरासिम सरपंच राजू सवर्णे, तांदलवाडी सरपंच सुरेखा तायडे, साळशिंगी उपसरपंच सोनल गायकवाड, पंकज वाघ, सावन मेढे, सुरेश तायडे, साहेबराव वानखेडे, महेश तायडे, उमेश गाढे, नगीन इंगळे सर, संतोष पाटील, भारतीय बौध्द महासभेचे रावेर तालुका अध्यक्ष अनोमदर्शी तायडे, जिल्हा सरचिटणीस सुमंगल अहिरे, केद्रीय शिक्षक विजय अवसरमल, धनराज घेटे,रघुनाथ कोंघे, समाधान साबळे, अनिल घेटे यांचेसह असंख्य रावेर तालुका बौद्ध समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी समाजाकडून "धम्मरत्न" म्हणून विजय अवसरमल, दिलीप पोहेकर, सदाशिव निकम, युवराज तायडे, दीपक तायडे, यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम प्रास्ताविक फुले, शाहू, आंबेडकर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे यांनी केले. तर सूत्रसंचालन वरिष्ठ पत्रकार दीपक नगरे यांनी केले.
विवाह सोहळा संघरत्न दामोदरे यांचे हस्ते पार पडला. तर कार्यक्रम यशस्वीते साठी सर्व रावेर तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते.समाज बांधव यांनी परिश्रम घेतले.





