यावल ते भुसावळ जाणाऱ्या एसटी बसवर कोसळले चिंचेचे झाड ; 13 प्रवासी जखमी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


आज सोमवार दि.9 रोजी दुपारी घडली घटना

यावल दि.9(सुरेश पाटील)मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असलेल्या यावल भुसावळ रस्त्यावर यावल पासून चार किलोमीटर अंतरावर पाटचारी च्या पुढे यावलकडून भुसावळ कडे जाणाऱ्या यावल आगारातील एसटी बस क्र.एम.एच. 20बी.एल.2542 वर एक चिंचेचे झाड अचानक कोसळल्याने बस मधील एकूण 13 प्रवासी जखमी झाल्याची खळबळजनक घटना आज सोमवार दि.9 में2022 रोजी घडल्याने मोठी खळबळ उडाली.[ads id="ads1"] 

  अपघाताचे वृत्त कळताच यावल आगाराचे व्यवस्थापक जी. पी.जंजाळ.यांनी व त्याठिकाणी उपस्थितांनी जखमींना यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यासाठी धावपळ करून व्यवस्था केली.जखमीवर वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला. व त्यांच्या संपूर्ण वैद्यकीय पथकाने औषध उपचार केले.

          अपघातातील जखमींना यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक जी.पी.जंजाळ वाहतूक निरीक्षक के.डी.चौधरी ठाकरे यांनी मदत म्हणून तात्काळ पाचशे रुपये तर काही जखमींना एक हजार रुपयाची मदत केली.[ads id="ads2"] 

        अपघातात एसटी चालक शालिक भारी वाहक एस पी महाजन तसेच प्रवासी जहांगीर सिकंदर तडवी वय 34 राहणार चुंचाळे ता.यावल,कल्पना सतीश चौधरी वय 55 रा.डोंबिवली मंगला रामदास चौधरी वय 55 राहणार वढोदे,दीपक वानखेडे वय 24 रा.चुंचाळे,इच्छाराम तुकाराम राजपूत वय 70 रा. सांगवी खुर्द,पंडित लक्ष्मण करणकर रा.भास्करनगर यावल, शकुंतला विलास चौधरी वय60 रा.धानोरा ता.चोपडा दीपक टोपलु वानखेडे वय 24 रा.चुंचाळे/बोराळे ता.यावल, पद्माबाई रमेश कोळी वय 50 रा.निमगाव ता.यावल, सुशिलाबाई किसन धनगर वय 42 रा.मुक्ताईनगर, नीलम शैलेंद्र पाटील वय 19 रा.दहिगाव ता.यावल,जोहराबाई रशीद खाटीक वय47रा.अडावद ता.चोपड़ा, शिवाजी भीमराव गजरे रा.चुंचाळे ता.यावल इत्यादी एकूण 13 प्रवासी जखमी झाले त्यांच्यावर औषध उपचार करण्यात आले.

      यावल तालुक्यात भुसावळ रोडवर व इतर प्रमुख रस्त्यांवर जुने वृक्ष,जीर्ण वृक्ष व त्यांच्या कोरड्या झालेल्या फांद्या कुठून किंवा रस्त्यावर कोसळून अशा प्रकारचे अपघात होऊ नये म्हणून संबंधित संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ उपाय योजना करायला पाहिजे किंवा अशा जुन्या वृक्षांनी बाबत संबंधित अधिकाऱ्यांनी आज पाहतो काय कार्यवाही केली आहे याबाबत सुद्धा आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत कारण जोरदार किंवा सामान्य वादळ पाऊस नसताना बस वर एक झाड कोसळणे ही दुर्दैवी घटना सर्वांना आत्मचिंतन करून उपाययोजना करण्यालायक घटली आहे यासाठी प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे पत्रव्यवहार करून जुने पडके वृक्ष किंवा वृक्षावरील कोरड्या झालेल्या फांद्या तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे वृक्ष आणि फांद्या तात्काळ हटविण्याबाबत कार्यवाही करावी अशी वस्तुस्थिती निर्माण झाली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!