शोएब खान युनूस खान आदिलशाह फारुकी संस्थे तर्फे डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मानित

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


विविध क्षेत्रातील ४३ मान्यवर सन्मानित 

जळगाव जिल्ह्यातील अडावद येथील नामांकित आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थे मार्फत रविवार ८ मे रोजी डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराचे वितरण करण्यात आले.[ads id="ads1"] 

ज्यामध्ये महाराष्ट्र भरातून विविध क्षेत्रातील मान्यवरांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आहे,आदिलशाह फारुकी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा वार्षिक १४ वा पुरस्कार वितरण सोहळा होता.

 निंभोरा येथील सामाजिक कार्यकर्ते शोएब खान युनूस खान यांना सामाजिक,उत्तेजनार्थ सदर पुरस्काराने विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.[ads id="ads2"] 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षण विस्तार अधिकारी श्री विजय पवार जळगाव हे होते राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉ पाकिजा उस्मान पटेल पारोळा व डॉ जावेद शेख यावल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी मुख्याध्यापक फारूक पटेल यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सौ राजेश्वरी पंकज पाटील पुणे,डॉ उस्मान पटेल पारोळा, मण्यार बिरादरी जिल्हाध्यक्ष फारूक शेख,अंकुर साहित्य परिषद सह सचिव तथा केंद्रीय मानवाधिकार संगठन सह सचिव हकीम आर चौधरी, ,ज्येष्ठ पत्रकार मो.फारुक जी खामगाव, मजीद जी जकरिया जळगाव, अजमल शाह जळगाव, नूरुद्दीन मुल्लाजी कासोदा,शब्बीर अहमद सर अडावद यांची प्रमुख उपस्थिती होती.

जळगाव येथील अल्पबचत भवन येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. संस्था अध्यक्ष फारुख शाह नौमानी यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ जावेद शेख,विशेष सल्लागार उस्मान पटेल,सहकारी अय्युब शेख,अल्ताफ शेख यांनी परिश्रम घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!