या कार्यक्रमाला विषेश उपस्थिती रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी, श्रीराम इरीगेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील, पद्माकर महाजन, दिपक पाटील, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस सुमंगल अहिरे, ऐ.टी.सुरडकर, एस. पी. जोहरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन जिल्ह्यात धार्मिक व सामाजिक कार्य गतिमान केल्याबद्दल रावेर तालुक्यातील बौद्ध समाज्याच्या वतीने व फुले-शाहू-आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था रावेर यांनी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक केंद्रीय शिक्षक विजय शामराव अवसरमल यांना धम्मरत्न पुरस्काराने सन्मानित केले.[ads id="ads2"]
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील, रावेर नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष रंजना गजरे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजु भाऊ सुर्यवंशी, नगरसेवक जगदिश घेटे, उद्योजक दिपरत्न तायडे, राजु घेटे, दैनिक लोकशाहीचे उपसंपादक दिपक नगरे, फुले-शाहू-आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.



.jpg)