ऐनपूर (विजय अवसरमल) : येथील ऐनपूर परीसर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय योग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ सचिन झोपे डॉ पी आर गवळी यांनी योगसने करून दाखवली.[ads id="ads1"]
नौकासन भुजंगासन, धनुरासन व प्राणायाम करून दाखवले व विद्याथ्यांकडून करून घेतली. प्रत्येक आसणाचे आपल्या शरीरावर होणारे फायदे सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना योगा नियमित केल्याने मन स्थिर राहते. योग लक्ष किंवा साध्य आहे. [ads id="ads2"]
अर्थात योग हि अवस्था आहे ज्यात दृश्य _ अदृश्य शरीराच्या सर्व घटकांचा परस्पर संयोग व समतोलपणा साधला जातो. एक दिवशीय कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ विनोद रामटेके, डॉ एस एस साळुंखे प्रा एस पी उमरीवाड तसेच सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ एस एस साळुंके यांनी केले. कार्यशाळेचे आभार डॉ विनोद रामटेके यांनी केले.



