रावेर शहरातील 21 वर्षीय विवाहितीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मौसमी शीतल मलिक (21, चौराहा, रावेर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. विवाहितेने आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही.[ads id="ads1"]
रावेर पोलिसात गुन्ह्याची नोंद
पश्चिम बंगालमधील बनाथाली गुरु होगली येथील मूळ रहिवासी असलेले शीतल मलिक हे सोन्याचे दागिने तयार करतात व पत्नी मौसमी मलिक (21) सह शहरातील चौराहा भागात वास्तव्यास आहेत. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेपूर्वी मौसमी यांनी ओढणीच्या सहायाने छतास गळफास घेत आत्महत्या केली. [ads id="ads2"]
याबाबत अतुल सुरेश सपकाळे यांनी दिलेल्या खबरीवरुन रावेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. नाईक सुरेश मेढे पुढील तपास करीत आहे.



