वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने ऍड मा.खा. बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. सकाळी 10 वाजता नेत्रदान शिबीर कृषी उत्पन्न बाजार समिती रावेर येथे नंतर 11 वाजेला ग्रामीण रुग्णालय रावेर येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.[ads id="ads2"]
वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे व डॉक्टर अमित कुलकर्णी, डॉक्टर सोताती बारेला, सतीश सूर्यवंशी, वळवी रेबी यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले. 11:30 वाजता वंचित बहुजन आघाडी रावेर च्या वतीने सभासद मोहीम राबवण्यात आली.
या प्रसंगी ऐनपूर येथील अमोल पाटील व जितेंद्र कोळी यांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षात प्रवेश केला.
या प्रसंगी माळी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष पिंटू महाजन, फुले-शाहू-आंबेडकर संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे, पत्रकार देवलाल पाटील, पत्रकार सुनील चौधरी, नगरिया शेठ, रमन तायडे सर, दिलीप लहासे, बाळु शिरतुरे, रफिक बेग, विनोद तायडे, अर्जुन वाघ, राजेंद्र अवसरमल, नितीन अवसरमल, कंदरसिंग बारेला, शेख इमरान, गुंजा बारेला, ग्यानसिंग बारेला, संघरत्न शिरतुरे, प्रतिक दामोदरे, ज्ञानेश्वर गाढे, अमोल पाटील, जितेंद्र कोळी, योगेश गाढे, दुर्गेश हिवरे, दिलीप पावरा, मुकेश बारेला, करण गाढे, प्रकाश लहासे यांचेसह आदी उपस्थित होते.





