भुसावळ रेल्वे स्थानकावर आढळले दोन मृतदेह ; ओळख पटविण्याचे आवाहन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

भुसावळ रेल्वे स्थानकावर आढळले दोन मृतदेह ; ओळख पटविण्याचे आवाहन

 भुसावळ येथील रेल्वेस्थानकावर फलाट क्रमांक दोनवर तसेच सहावर अज्ञात व्यक्तींचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. भुसावळ रेल्वेस्थानकाच्या (Bhusawal Railway Stations) फलाट क्रमांक दोनवर जळगावच्या दिशेने एका अंदाजे ४० वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना ९ रोजी घडली.[ads id="ads1"] 

याबाबत रेल्वेस्थानक व्यवस्थापकांच्या खबरी वरून लोह अकस्मात मृत्यूची नोंद मार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. फलाट क्रमांक २ वर जळगावच्या दिशेने हा मृतदेह आढळून आला. मयताची उंची पाच फूट चार इंच, रंग काळा शरीराने सडपातळ डोक्यावर केस वाढलेले चेहरा गोल नाक सरळ डोळे बारीक, डावा डोळा पांढरा झालेला आहे. असे त्या मृत झालेल्या इसमाचे वर्णन असून, याबाबत कुणाला काही माहिती असल्यास भुसावळ रेल्वे पोलीस यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन तपासी अंमलदार प्रदीप राणे यांनी केले आहे.[ads id="ads2"] 

फलाट क्रमांक सहावर मृतदेह दुसरा मृतदेह फलाट क्रमांक सहावर आढळून आला. एक पुरुष जातीच्या अज्ञात इसमाचा नैसर्गिकरित्या कोणत्यातरी दीर्घ आजाराने मृत्यू झाला असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. याबाबत रेल्वे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रेल्वेस्थानक व्यवस्थापक यांनी दिलेल्या खबरीवरून ही नोंद आहे. मयताची उंची पाच फूट रंग सावळा, शरीर सडपातळ, डोक्यावरील केस काळे, चेहरा लांबट, नाक सरळ, डोळे बारीक, दाढी वाढलेली उजव्या हाताच्या मनगटावर अस्पष्ट गोंदलेले असे वर्णन पोलिसांनी सांगितले. याबाबत कोणास काही माहिती असल्यास रेल्वे पोलीस स्टेशनचे हवालदार आनंदा सरोदे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!